शिवाजी कुबल कुटुंबीयांचे
आमदार वैभव नाईक
यांच्याकडून सांत्वन
वेंगुर्ले | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रतिष्ठित ‘कृषिभूषण’ आणि ‘कृषिरत्न’ पुरस्कारांनी सन्मानित झालेले वेंगुर्ले येथील ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष कै. शिवाजी रमाकांत कुबल यांच्या नुकत्याच झालेल्या निधनामुळे कुबल कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
या दुःखद पार्श्वभूमीवर, कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाైक यांनी आज वेंगुर्ले येथील कुबलवाडा येथील निवासस्थानी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी दिवंगत शिवाजी कुबल यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना या कठीण प्रसंगी धीर दिला.
यावेळी त्यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.








