कळसुली येथील श्री. स्वामी समर्थ मठात प्रकटदिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न

कणकवली ( प्रतिनिधी)

श्री स्वामी समर्थांच्या नामाच्या जयघोषात झाले स्वामी भक्त तल्लीन 

कळसुली येथील श्री. स्वामी समर्थ मठात प्रकटदिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न

कणकवली तालुक्यातील कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा सोमवार ३१ मार्च रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण संपन्न झाला.

प्रकटदिन सोहळ्यानिमित्त भक्तीमय वातावरणाने कळसुली स्वामी समर्थ मठाचा परीसर भारावून गेला.काकड आरती,पुण्याहवाचन, अभिषेक,होम हवन, स्वामींची पादुका पूजन, सत्यनारायण महापूजा,महाआरती, महाप्रसाद ,श्री.स्वामी समर्थ चरित्र सामुहिक पठण,नामस्मरण, लहान मुलांचे सांस्कृतिक, नृत्य कार्यक्रम,स्थानिकांची भजने, पालखी मिरवणूक,पंचक्रोशीतील स्थानिक भजन मंडळाची भजने,वारकर्‍यांची दिंडी, रात्री . ह.भ.प. पुरुषोत्तम पोखरणकर महाराज यांचे कीर्तन आदी कार्यक्रम संपन्न झाले.

यावेळी श्री.स्वामी समर्थ मठ आणि परीसर स्वामी नामाच्या जयघोषात भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता.
कणकवली-कुडाळ तालुक्यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वामी भक्तांनी कळसुली येथील श्री स्वामी मठात भेट दिली आणि स्वामींचे दर्शन घेतले.

यावेळी भाविक भक्तांची मांदियाळी पसरली होती.श्री.स्वामी समर्थांच्या नामाच्या जयघोषात स्वामी भक्त तल्लीन होऊन भक्ती रसात न्हाऊन गेले.

दिंगबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.दत्ता दिगंबरा याओ, स्वामी मला भेट द्या ओ.,गुरु महाराज गुरु,जय जय परब्रम्ह सद्गुरू

.दत्ता दिगंबरा या हो.स्वामी मला भेट द्या ओ.स्वामी स्वामी बोला ओ,ब्रम्हांनदी डोला ओ,

पायी हळूहळू चाला, मुखाने स्वामी समर्थ बोला.मुखाने स्वामी स्वामी बोला,

कपाळी केशरी गंध, स्वामी मला तुझा छंद.तन मन धन आज अर्पूनी चरणी, स्वामी राया शेवट गोड करी.स्वामी नामाच्या अशा नामघोषात कळसुली येथील स्वामी समर्थ मठात स्वामी भक्त तल्लीन होऊन भक्ती रसात न्हाऊन गेले.

प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ कळसुलीच्या वतीने अध्यक्ष श्री.हनुमंत सावंत यांनी कार्यक्रमांचे यशस्वीपणे नियोजन करुन कार्यक्रम संपन्न केला.यावेळी जिल्हाभरातील स्वामी भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून स्वामींचे दर्शन घेतले.तसेच महाप्रसादाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घेतला.यावेळी भाविक भक्तांनी रांगेत उभे राहून स्वामी नामाचा जप करीत दर्शन घेतले.आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्गचे सुपुत्र समाजभूषण संदीप कदम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्त!

     समाजभूषण संदीप कदम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्त! ​छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कार्यकारिणी बैठकीत महत्त्वपूर्ण निवड; कोकणासह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव ​कणकवली / ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा साहित्य परिषद,…

    पुढे वाचा

    कणकवलीत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ अभिवाचन अनुभव कार्यक्रम उत्साहात संपन्न; रसिकांचा संस्मरणीय प्रतिसाद!

    कणकवलीत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ अभिवाचन अनुभव  रसिकांचा संस्मरणीय प्रतिसाद! ​कणकवली / प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हळवल येथे ‘आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल’ निर्मित आणि प्रस्तुत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ हा अनोखा अभिवाचन…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्गचे सुपुत्र समाजभूषण संदीप कदम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्त!
    कणकवलीत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ अभिवाचन अनुभव कार्यक्रम उत्साहात संपन्न; रसिकांचा संस्मरणीय प्रतिसाद!

    शिरवंडे शाळेच्या ‘श्री गणेश चतुर्थी भेटकार्ड’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; इयत्ता आठवीच्या दुर्वा लुडबे हिने गोळा केली तब्बल १०,६५७ रुपयांची देणगी!

    शिरवंडे शाळेच्या ‘श्री गणेश चतुर्थी भेटकार्ड’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; इयत्ता आठवीच्या दुर्वा लुडबे हिने गोळा केली तब्बल १०,६५७ रुपयांची देणगी!

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    error: Content is protected !!