कै. श्रीधरराव नाईक स्मृतिदिन
सामाजिक उपक्रम;
रक्तदान शिबीर
शेतकरी सन्मान
कणकवली:
समाजकार्य, शेतकरी हित आणि निस्वार्थी जनसेवेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे कै. श्रीधरराव नाईक यांच्या कार्याचा जागर करण्यासाठी, त्यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार, दिनांक २२ जून २०२६ रोजी कणकवली येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कै. श्रीधरराव नाईक फाउंडेशन’च्या वतीने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.









