कणकवली
दिव्यांग बांधव
मोफत साहित्य वाटप
सावली जनसेवा शिक्षण संस्था
गोपुरी आश्रम
कणकवली (प्रतिनिधी) :
सावली जनसेवा शिक्षण संस्था, वरवडे आणि गोपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली तालुक्यातील दिव्यांग बांधव व भगिनींसाठी सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी मोफत छत्री वाटपाचा विशेष उपक्रम राबवण्यात आला.
सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे ही संस्था सामाजिक भान राखत जिल्ह्यात अनेक ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप अनेक शाळांमधून नेहमी करत असते यामुळे गरीब होतकरू मुलांना एक प्रकारची मदत करण्याचं काम ही संस्था करत आहे..
पावसाळ्याच्या दिवसात दिव्यांग बांधवांना दैनंदिन कामासाठी बाहेर पडताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आणि आपली सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने हा उपक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमास सावली जनसेवा शिक्षण संस्थाचे अध्यक्ष प्रसाद देसाई, उपाध्यक्ष संतोष उर्फ पप्पू पुजारे, कार्याध्यक्ष महेंद्र सावंत, दिव्यांग संस्थेचे तालुकाध्यक्ष सुनील सावंत, सचिव सचिन सादिये, तसेच मोहन परब, दीपक दळवी, आदेश कारेकर, यल्लाप्पा पटी मनी, प्रकाश वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व भगिनी उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य तो आधार देणारे असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविणे ही काळाची गरज आहे. सावली जनसेवा शिक्षण संस्था व गोपुरी आश्रम यांच्या या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना पावसाळ्यात मोठा दिलासा मिळाला. मोफत छत्री मिळाल्याने उपस्थित दिव्यांग बांधवांनी सावली जनसेवा शिक्षण संस्थाचे आभार मानत या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.









