सिंधुदुर्ग जि.प. मा.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कणकवली प्रतिनिधी

कनेडी येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संदेश (गोट्या) सावंत यांचा वाढदिवस मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव करत साजरा

      सिंधुदुर्ग जिल्हा भाजप उपाध्यक्ष, माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा ५१ वा वाढदिवस २७ मार्चपासून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्त ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूर वारी, रस्सीखेच स्पर्धा, ड्रोन उडवणे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण, होम मिनिस्टर, पाककला स्पर्धा, वारकरी भजन स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविण्यात आले

.

कनेडी बाजारपेठ येथील भाजप नाटळ -सांगवे विभागीय कार्यालय येथे नाटळ व हरकुळ विभागाच्या वतीने गुरुवारी सकाळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून गोटया सावंत यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

“खासदार नारायण राणे हाच आपला पक्ष आहे”. राणे कुटुंबीयांनी आपल्याला भरभरून दिले आहे. आपण राजकारणात कुठल्या अपेक्षेने काम करीत नसून समाजाच्या हितासाठी काम करीत आहे. जनतेने दिलेले प्रेम आपण विसरु शकत नाही.यापुढेही जनतेसाठीच काम करणार असल्याची ग्वाही गोट्या सावंत यांनी या सत्काराला उत्तर देताना दिली.

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ संजना सावंत, जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था पालघरचे सचिव केदार चव्हाण, भाजप-नाटळ विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, माजी सभापती सुरेश ढवळ ,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मोहन सावंत ,ज्येष्ठ ग्रामस्थ रमेश सावंत ,तसेच विभागातील सर्व सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाजप कार्यकर्ते संदेश प्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्गचे सुपुत्र समाजभूषण संदीप कदम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्त!

     समाजभूषण संदीप कदम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्त! ​छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कार्यकारिणी बैठकीत महत्त्वपूर्ण निवड; कोकणासह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव ​कणकवली / ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा साहित्य परिषद,…

    पुढे वाचा

    कणकवलीत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ अभिवाचन अनुभव कार्यक्रम उत्साहात संपन्न; रसिकांचा संस्मरणीय प्रतिसाद!

    कणकवलीत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ अभिवाचन अनुभव  रसिकांचा संस्मरणीय प्रतिसाद! ​कणकवली / प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हळवल येथे ‘आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल’ निर्मित आणि प्रस्तुत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ हा अनोखा अभिवाचन…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्गचे सुपुत्र समाजभूषण संदीप कदम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्त!
    कणकवलीत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ अभिवाचन अनुभव कार्यक्रम उत्साहात संपन्न; रसिकांचा संस्मरणीय प्रतिसाद!

    शिरवंडे शाळेच्या ‘श्री गणेश चतुर्थी भेटकार्ड’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; इयत्ता आठवीच्या दुर्वा लुडबे हिने गोळा केली तब्बल १०,६५७ रुपयांची देणगी!

    शिरवंडे शाळेच्या ‘श्री गणेश चतुर्थी भेटकार्ड’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; इयत्ता आठवीच्या दुर्वा लुडबे हिने गोळा केली तब्बल १०,६५७ रुपयांची देणगी!

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    error: Content is protected !!