देवगड : प्रतिनिधी
कणकवली विधानसभेच्या जागेबाबत शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आदिंचे एकमत झाले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून संदेश पारकर यांना कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संदेश पारकर यांची उमेदवारी घोषित केली.

शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर संदेश पारकर यांचे आवाहन या मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्कीच रंगत आणणार आहे.. भाजपचं कमळ विरुद्ध उबाठाची मशाल अशी चिन्ह घेऊन निवडणूक लढवली जात आहे. संदेश पारकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे








