‘छत्रपती शिवाजी महाराज
महसूल समाधान शिबिर’
नगराध्यक्ष संदेश पारकर
महसूल मंत्र्यांचे स्वागत

कणकवली | ३ ऑगस्ट:
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तहसीलदार कार्यालयात विशेष समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिराच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , पालकमंत्री नितेश राणे, आमदार प्रमोद जठार, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आदी मान्यवर उपस्थित होते..
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली . यावेळी त्यांचे शाल,त्रिफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाचे कौतुक: यावेळी बोलताना, महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि गतिमान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून सुरू असलेल्या विविध प्रयत्नांचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी विशेष कौतुक केले.
तळागाळातील नागरिकांपर्यंत महसूल विभागाच्या योजना पोहोचवणे, नागरिकांच्या अडीअडचणी जागेवरच सोडवणे आणि शासकीय कागदपत्रे व दाखले सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे हा या ‘समाधान शिबिराचा’ मुख्य उद्देश आहे. कणकवली येथे पार पडलेल्या या शिबिरामुळे अनेक नागरिकांच्या महसूल विषयक समस्यांचे तात्काळ निराकरण झाले आहे.








