मोबाईलच्या युगातही छायाचित्रकारांचे महत्त्व अबाधित: गोट्या सावंत

मोबाईलच्या युगातही छायाचित्रकारांचे महत्त्व अबाधित: गोट्या सावंत

​कणकवली:

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कणकवली फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने प.पु. भालचंद्र महाराज संस्थान सभागृहात भव्य फोटोग्राफी प्रदर्शन आणि छायाचित्र स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मोबाईलच्या वाढत्या वापराच्या युगातही छायाचित्रकारांचे स्वतंत्र अस्तित्व आणि कलाकारीचे महत्त्व कायम असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोटया सावंत यांनी केले.

​माजी जि.प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते फित कापून व दीपप्रज्वलन करून या प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पारधिये यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि जिल्ह्यातील तरुण व अनुभवी छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​

​छायाचित्रकारांचे योगदान: गोट्या सावंत यांनी आपल्या ३४ वर्षांच्या सार्वजनिक प्रवासात फोटोग्राफरांच्या योगदानाचा गौरव करत, जुन्या अल्बम्समधील कागदावर जतन केलेल्या फोटोंमधील जिवंतपणा आणि आठवणी मोबाईलमधील फोटोंपेक्षा वेगळ्या व चिरकाल टिकणाऱ्या असल्याचे सांगितले.

पत्रकार आणि फोटोग्राफर परस्परपूरक: कलमठ सरपंचांनी फोटोग्राफर आणि पत्रकारामुळेच राजकारणात व समाजात यशस्वी होता आल्याची भावना व्यक्त केली. तर भगवान लोके यांनी फोटोग्राफरच्या अचूक छायाचित्रांमुळेच पत्रकारांना उत्तम बातम्या तयार करण्याची दृष्टी मिळते, असे नमूद केले.

​स्पर्धेचा उद्देश: ग्रामीण व जिल्हा पातळीवरील फोटोग्राफरमधील ‘वेडिंग फोटोग्राफी’च्या प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पारधिये यांनी प्रास्ताविकात सांगितले.

​ज्येष्ठ छायाचित्रकार पराग शिंदे आणि विजय शेट्टी यांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षण केलेल्या वेडिंग फोटोग्राफी स्पर्धेचे विजेते खालीलप्रमाणे:

​प्रथम क्रमांक: अवधूत लाड

​द्वितीय क्रमांक: विनायक पारधिये

​तृतीय क्रमांक: चेतन पवार

​उत्तेजनार्थ: मनोज पारकर आणि सागर पाटील

​सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कणकवलीतील या पहिल्याच मोठ्या प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

​

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!