शिव कोकण विभाग संपर्क प्रमुख
शंकर पार्सेकर
मुंबई:
शिवसेना प्रेरित ‘शिव व्यापार व रोजगार सेना’ या संघटनेच्या कोकण विभाग संपर्क प्रमुखपदी श्री. शंकर पांडुरंग पारसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १६ जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या नियुक्ती पत्राद्वारे त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हिंदूहृदयसम्राट वंदनीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर श्री. आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून, तसेच शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या संघटनेने पारसेकर यांच्यावर हा विश्वास दाखवला आहे.
नियुक्ती पत्रात नमूद केल्यानुसार, पारसेकर यांच्या संघटनेचे कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आत्मीयता लक्षात घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचेल, बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्यास मदत होईल आणि व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
ही नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी असणार असून, कार्यकारी अध्यक्ष श्री. शैलेश आर. जायसवाल आणि संस्थापक अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर सहदेव सावंत यांनी श्री. पारसेकर यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.








