आमदार नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेताच सर्वत्र घोषणा आणि फटाक्यांची आतषबाजी

कणकवली प्रतिनिधी

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिपद जाहीर झाले. यानंतर आमदार नितेश राणे केव्हा मंत्री पदाची शपथ घेणार यांची उत्ससूकता लागून राहिली होती. अखेर आज आ. नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरात शपथविधी पाहण्यासाठी थेट लाईव्ह स्क्रिन लावण्यात आली होती

.दरम्यान आ. नितेश राणे यांनी शपथ घेताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी व फटाके लावून जल्लोष साजरा केला. यावेळी हमारा नेता कैसा हो … नितेश राणे जैसा हो, नितेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है घोषणा देण्यात आल्या. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला.

सरकारमध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी पहिल्यांदाच मंत्री पदाची ३० व्या क्रमांकावर शपथ घेतली. यामुळे कणकवली मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रखर हिंदुत्व मानून संघर्ष करणारे हिंदुत्ववादी नेते अशी ओळख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिल्यानतंर त्यांची थेट कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याने कणकवली मतदारसंघाला पहिल्यांदाच मंत्री पद मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने त्याचीच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित आहे ?

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!