निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्थेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी पंढरी रामचंद्र जाधव यांची नियुक्ती

निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्थl

कोकण विभाग अध्यक्षपदी पंढरी रामचंद्र जाधव

​कणकवली | प्रतिनिधी

          ​निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि समाजसेवेची बांधिलकी जोपासणाऱ्या ‘निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र’ या संस्थेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी पंढरी रामचंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मोठ्या विभागाची धुरा आता जाधव यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

            संस्थेचे संस्थापक बापू परब यांनी पंढरी जाधव यांच्या आजवरच्या सामाजिक आणि पर्यावरणीय कार्याची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. कोकण विभागांतर्गत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर आणि पालघर अशा सात जिल्ह्यांचा समावेश होतो. या व्यापक कार्यक्षेत्रात संस्थेच्या कामाचा विस्तार आणि बळकटीकरण करण्याची जबाबदारी जाधव यांच्यावर असेल.

पंढरी रामचंद्र जाधव हे मूळचे शिवडाव गावचे सुपुत्र असून सध्या ते कणकवली-जानवली येथे वास्तव्यास आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. समाजसेवेची प्रचंड आवड आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाची मनापासून असलेली बांधिलकी यामुळे ते अनेक संस्था आणि उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. यापूर्वीही त्यांनी विविध पर्यावरण संवर्धन संस्थांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे, ज्याची दखल घेत त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना पंढरी जाधव म्हणाले की, “पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. या कार्यात सर्वांचा सहभाग मिळवून कोकण विभागात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

​जाधव यांच्या नियुक्तीचे सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातून स्वागत होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभागात पर्यावरण रक्षणाचे काम अधिक गतीने होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!