राष्ट्रवादी काँग्रेसचा वैभव नाईकांच्या पाठिशी – अमित सामंत

कुडाळ : प्रतिनिधी

कोरोना काळातील वैभव नाईक यांचे कार्य उल्लेखनीय राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडून कौतुक !

कुडाळ-मालवण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज मराठा समाज हॉल कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आ. वैभव नाईक देखील व्यक्तीनीशी या बैठकीला उपस्थित होते.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार वैभव नाईक यांच्या ताकदिनिशी पाठीशी उभा राहून त्यांना तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्याचा एकमुखी निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत बोलताना म्हणाले की गेल्या पाच वर्षांमध्ये आ.वैभव नाईक यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनासोबत घेऊन सातत्यपूर्ण चर्चा करून काम केले.कुडाळ-मालवण मध्ये विकासाची गंगा काय असते हे वैभव नाईक यांच्या रूपाने अनुभवता आली,त्यांना सामान्य माणसाबद्दल जाण आहे. गेली १० वर्षे ते शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीने विधानसभेत सातत्याने मांडुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत आहेत.कोरोना काळात जीवाची पर्वा न करता त्यांनी मतदारसंघातील नागरीकांसाठी स्वतः रस्त्यावर उतरून आरोग्य सुविधा पुरविल्या,मतदारसंघातील पाण्याचे प्रश्न, शासकीय मेडिकल काॅलेज अशी अनेक विकासकामांची चौफेर फटकेबाजी केली. पुढे बोलताना सामंत म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मी म्हणजे आमदार वैभव नाईक असे समजून काम केले पाहिजे व आमदार वैभव नाईक यांना तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवून देण्याचे आव्हान त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, सरचिटणीस भास्कर परब,सोशल मीडिया प्रमुख सचिन परब,कार्याध्यक्ष प्रसाद रेगे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

पुढे वाचा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

पुढे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे विसरू नका

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

error: Content is protected !!