नांदगाव ब्रिजवर आर्टिगा कारच्या अपघातात आईचा मृत्यू, वडील व मुलगी गंभीर

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

कणकवली :

मुंबई – गोवा महामार्गावरील नांदगाव ब्रिज येथे आज सकाळी ९:३० वा.च्या सुमारास आर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती व मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई येथून हिर्लोक, कुडाळच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. कारमध्ये आई, वडील व मुलगी असे तिघेजण प्रवास करत होते. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना कारमधून बाहेर काढले. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार दिल्यानंतर अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला. सुदैवाने कार डिव्हायडरवरील बॉक्समधून कार सर्व्हिस रस्त्यावर कोसळता-कोसळता थांबली, अन्यथा आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे व पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

नांदगाव ब्रिजवर आर्टिगा कारच्या अपघातात आईचा मृत्यू, वडील व मुलगी गंभीर

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावरील नांदगाव ब्रिज येथे आज सकाळी ९:३० वा.च्या सुमारास आर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती व मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई येथून हिर्लोक, कुडाळच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. कारमध्ये आई, वडील व मुलगी असे तिघेजण प्रवास करत होते. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना कारमधून बाहेर काढले. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार दिल्यानंतर अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला. सुदैवाने कार डिव्हायडरवरील बॉक्समधून कार सर्व्हिस रस्त्यावर कोसळता-कोसळता थांबली, अन्यथा आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे व पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!