मातोश्री वृद्धाश्रमात गुरुपौर्णिमा ज्येष्ठांचा सत्कार
उजळले आनंदाचे क्षण

कणकवली :
ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे आणि संस्कृतीचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनुभव आणि त्यांनी दिलेले संस्कार हे आपल्यासाठी मार्गदर्शनासारखे मोलाचे आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबईचे उपाध्यक्ष तथा माजी शिक्षण विस्तार अधिकारी मोहन सावंत यांनी केले. सांगवे येथील मातोश्री वृद्धाश्रमात गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, तर अनेकांच्या चेहऱ्यावरफुललेला आनंद उपस्थितांच्या मनाला स्पर्ष करून गेला.
![]()
![]()
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
-
सत्कार व कृतज्ञता: मोहन सावंत व त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि खाऊ देऊन सन्मान करण्यात आला.
-
प्रेरणादायी मनोगत: “गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ शाळेतील शिक्षकांचा सन्मान नव्हे, तर आपल्या जीवनातील पहिले आणि खरे गुरु आपले आई-वडील व हे वृद्धच आहेत. वृद्धाश्रमातील प्रत्येक आजी-आजोबा म्हणजे एक चालते-बोलते विद्यापीठ आहे,” असा मोलाचा संदेश यावेळी मोहन सावंत यांनी दिला.
-
मान्यवरांची उपस्थिती: कार्यक्रमास माजी मुख्याध्यापिका मनीषा सावंत, नाटळ सोसायटीचे संचालक मिलिंद डोंगरे, शिंदे, व्यवस्थापक घाडीगावकर, तसेच आश्रमातील जेष्ठ नागरिक आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
-
आयोजन व सूत्रसंचालन: कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनेने झाली. सूत्रसंचालन मनीषा सावंत यांनी केले, तर मिलिंद डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. आश्रमाचे व्यवस्थापक आणि सावंत कुटुंबियांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.









