डॅशिंग
कर्तृत्ववान नेतृत्व
शिवसेना सिंधुदुर्ग उपिल्हाप्रमुख श्री. महेश राणे यांचा वाढदिवस
सिंधुदुर्ग :
यशस्वी उद्योजक ते शिवसेना सिंधुदुर्ग उपिल्हाप्रमुख असा यशस्वी प्रवास घडलेले मालवण तालुक्यातील असरोंडी गावचे सुपुत्र श्री. महेश राणे यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि दमदार नेतृत्वाने स्वतंत्र ठसा उमटवला आहे. सामाजिक बांधिलकी जपत सदैव मदतीसाठी तत्पर राहत त्यांनी अनेकांना आधार आणि रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
पक्षाच्या संघटनामध्येही मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करत, स्थानिक पातळीवर पक्षाला यश मिळवून देण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. एक यशस्वी, डॅशिंग आणि जनसामान्याेशी नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासह जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार ते व्यक्त करतात. अशा या कर्तृत्ववान, धडाडीच्या आणि समाजभिमुख नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे. ‘कोकण राज लाईव्ह’च्या वतीने वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!








