कणकवलीत १ डिसेंबर ला “एक दिवस छोटयांसाठी खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन -समीर नलावडे

कणकवली    (प्रतिनिधी)

        कणकवली येथील समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने कणकवली शहरातील चौंडेश्वरी मंदिर नजिक गणपती साना येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही “एक दिवस छोटयांसाठी “खाऊ गल्ली” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १ डिसेंबरला सायंकाळी ५:३० वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 

अशी माहिती कणकवली चे माजी नगराध्यक्ष तथा समीर नलावडे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष समीर नलावडे यांनी भाजप शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, संदीप नलावडे, बंडू गांगण, राजू गवाणकर, संदीप राणे, गौरव हर्णे, राजा पाटकर, नवू झेमणे, सुशील पारकर उपस्थित होते

पुढे बोलताना नलावडे म्हणाले की,हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणपती साना येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लहान मुलांना मज्जा, मस्ती करण्यासाठी साजरा करत आहोत. त्यामध्ये पुणे आणि मुंबईचे मिक्स ऑर्केस्ट्रा तसेच दोन सिंगर यांचा समावेश आहे. त्यानंतर लहान मुलांना टॅटू काढले जाणार आहेत. यावेळी गोव्याचे दोन टॅटू काढणारे येणार आहेत. लहान मुलांना मज्जा, मस्ती करण्यासाठी मिकी माऊस, कार्टून येणार आहेत. त्याच्यानंतर आपण लहान मुलांना व त्यांच्या पालकांना फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंट एक तयार केला आहे.

 येणाऱ्या प्रत्येक मुलाला जवळजवळ १००० मुलांना दरवर्षी आपल्याकडे एक हजार पेक्षा जास्त मुलं सहभागी होतात. यामध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या एक हजार मुलांना मित्रमंडळातर्फे छोटीशी भेट वस्तू देण्यात येणार आहे.

यावेळी लावण्यात येणाऱ्या स्टॉलवर भेळ, पाणीपुरी तसेच पारंपारिक पदार्थांची चव चाखता येणार आहे. त्याचप्रमाणे पिझ्झा, बर्गर, वडापाव, चिकन सारखे पदार्थ आणि लहान मुलांसाठी सगळ्यात आकर्षक झोपाळे, पाळणे इत्यादी खेळ खेळण्यासाठी सेल्फी पॉइंट एक तयार केला आहे. येणाऱ्या प्रत्येक मुलाला जवळजवळ १००० मुलांना दरवर्षी आपल्याकडे एक हजार पेक्षा जास्त मुलं सहभागी होतात. यामध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या एक हजार मुलांना मित्रमंडळातर्फे छोटीशी भेट वस्तू देण्यात येणार आहे.

यावेळी लावण्यात येणाऱ्या स्टॉलवर भेळ, पाणीपुरी तसेच पारंपारिक पदार्थांची चव चाखता येणार आहे. त्याचप्रमाणे पिझ्झा, बर्गर, वडापाव, चिकन सारखे पदार्थ आणि लहान मुलांसाठी सगळ्यात आकर्षक झोपाळे, पाळणे इत्यादी खेळ खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

येणाऱ्या लहान मोठ्या मुलांसाठी व पालकांसाठी ऑर्केस्ट्रा देखील ठेवण्यात आलेला आहे. या निमित्ताने जास्तीत जास्त लहान मुलांनी दरवर्षी प्रमाणे या उपक्रमात सहभागी होऊन याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन समीर नलवडे मित्रमंडळाचे संस्थापक माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!