आमदार दीपक केसरकर वाढदिवस
विविध सामाजिक उपक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी):
सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी कुटुंबीयांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी केक कापून आपल्या कुटुंबीयांसोबत जन्मदिवसाचा आनंद साजरा केला. या घरगुती कौटुंबिक सोहळ्याला त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर, नातू अर्जुन आणि इतर कौटुंबिक सदस्य उपस्थित होते, त्यांनी आमदार केसरकर यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सावंतवाडीत कार्यकर्त्यांकडून सामाजिक व कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन
केसरकर यांनी मुंबई येथे आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला असला, तरी त्यांनी फोनवरून सावंतवाडीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. “जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी ताकद असून माझे जीवन जनतेसाठी समर्पित आहे,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यात शिवसेना आणि दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून हा दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.
रक्तदान शिबीर: युवा रक्तादाता संघटना व नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत झाला.
रुग्ण व विद्यार्थी सेवा: महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांच्या पुढाकारातून उपजिल्हा रुग्णालय आणि अंकुर केंद्र येथे रुग्णांना बिस्कीट वाटप करण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र आणि शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य आणि वृक्षांचे वाटप करण्यात आले.
कार्यालयीन सोहळा: स्थानिक संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी एकत्र येत केक कापून आनंद साजरा केला.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ आणि युवा रक्तदाता संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या नेत्याला अनोख्या शुभेच्छा दिल्या.
या शिबिराचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. शिबिरादरम्यान उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल रक्तपेढीचे अधिकारी प्रशांत सातार्डेकर, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, अनिल खाडे, गोविंद श्रीरामे, रवीना लोहंबरे आणि प्राची राणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
संजू परब यांच्याकडून केसरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव
याप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. “दीपक केसरकर हे अत्यंत सरळ, साधे आणि कधीही कोणाचे वाईट न चिंतणारे व्यक्तिमत्त्व आहे,” अशा शब्दांत त्यांनी केसरकरांचे कौतुक केले. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी जी अफाट कामे केली, त्याचे श्रेय त्यांनी कधीही स्वतःकडे घेतले नाही, असे सांगत केसरकर यांच्यासारखा आमदार या मतदारसंघाला मिळणे कठीण आहे, अशा भावना परब यांनी व्यक्त केल्या. तसेच त्यांना आगामी काळात मंत्रीपद मिळावे, अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. कार्यक्रमात माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर आणि प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनीही आपली मनोगते व्यक्त करत केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.मान्यवरांची उपस्थिती व आयोजकांचे परिश्रम
या सामाजिक उपक्रमाला परिसरातील अनेक मान्यवरांनी आणि लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली होती.प्रमुख उपस्थिती: शहरप्रमुख बाबू कुडतरकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा आमदार प्रतिनिधी देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे, सुप्रिता धारणकर, भारती परब, पूजा नाईक, शगुप्ता पडवेकर, शितल नाईक, निलम कुमठेकर, राजश्री निर्गुण, विश्वास घाग, गजानन नाटेकर आणि बासीत पडवेकर उपस्थित होते.
विशेष सहभाग: शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे संदीप निवळे, वसंत सावंत, ॲड. प्रसाद नाटेकर, पंकज बिद्रे, क्रिश सावंत, भास्कर आमुणेकर, भगवत पोळ आणि मेहर पडते यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली










