कळसुली हायस्कूल नजीक १३ एप्रिला सेमी शूटिंग बॉल स्पर्धा
खासदार नारायण राणे
अमृत महोत्सवी वर्ष

कणकवली(प्रतिनिधी)
युवा शूटिंग व्हॉलीबॉल मिन्नमंडळ, कळसुली यांच्या वतीने आयोजित तसेच भारतीय जनता पार्टी शाखा – कळसुली पुरस्कृत शूटिंग बॉल स्पर्धेचे कळसुली हायस्कूल जवळील पटांगण वर आयोजन करण्यात आले आहे. मा. खासदार श्री. नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा सोमवार, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी कळसुली येथील इंग्लिश स्कूलच्या शेजारील मैदानावर पार पडणार आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघांसाठी ही स्पर्धा मर्यादित स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश फी ५०० रुपये ठेवण्यात आली असून विजेत्या संघांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक म्हणून ८८८८ रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक ५५५५ रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठीही आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहेत.
ही स्पर्धा कळसुली दशक्रोशीतील क्रीडा प्रेमींसाठी आकर्षण ठरणार
तरी सर्व शूटिंग बॉल संघांनी आपला सहभाग लवकरात लवकर निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.








