कणकवली प्रतिनिधी
कणकवलीत आरबी बेकर्स सह मेडिकल स्टोअर रात्री लागलेल्या भीषण आगीत भस्मसात

शहरातील नामांकित असलेल्या पटवर्धन चौक येथिल आरबी बेकरी आणि बर्डे मेडिकल व राजू गवाणकर यांच्या कार्यालयाला 1 नोव्हेंबर रोजी पहाटे4 वाजता लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
ऐन दिवाळीच्या तोंडावर लक्ष्मीपूजना दिवशी घडलेल्या या घटनेबाबत दुःख देखील व्यक्त केले.त्यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, वैभव मालंडकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
तसेच आमदार नितेश राणे यांना ही घटना समजताच जळीतझालेल्या. घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत जळीतग्रस्तांना धीर दिला यावेळी समीर नलावडे ,बंडू हर्णे, अबीद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते
कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन या मुख्य चौकात असलेल्या आरबी बेकरीसह एक मेडिकल स्टोअर आणि एका खाजगी ऑफिसला आग लागून मोठे नुकसान झाले.
शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कणकवली तसेच कुडाळ नगरपंचायत व कुडाळ एमआयडीसी येथे अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले होते.

रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना ही आग दिसून आली. त्यांनी तातडीने बेकरीच्या मागे असलेल्या राजू, गौरव गवाणकर यांना उठवून याबाबत कल्पना दिली. त्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आग अधिकच भडकत गेली. त्यात वीज गेल्याने आणखी समस्या येत होती. शॉर्टसर्किटने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.
आर बी बेकर्स यांचा दुकानातील संपूर्ण फर्निचर, बेकरी माल जळून खाक झाला. तर बेकरीच्या मागील राजू गवाणकर यांचे कार्यालय आणि कार्यालयालगत असलेल्या बर्डे यांच्या मेडिकल स्टोअर मधील साहित्याचे ही मोठे नुकसान झाले. घटनास्थळी पोलीस नगरपंचायत, महसूल प्रशासन दाखल झाले होते. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मालवण नगरपालिकेची अग्निशमन गाडी ही दाखल झाली होती.








