चिवला बीच मालवण येथे २१, २२ डिसेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांना प्रवेश फी मध्ये सवलतीसाठी निवेदन

महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच मालवण येथे २१, २२ डिसेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांना प्रवेश फी मध्ये सवलत मिळावी यासाठी मालवण भाजपच्या शहर मंडळ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांच्या वतीने बाबा परब, उपाध्यक्ष जलतरण संस्था सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले.

मालवण चिवला बीच येथे संपन्न होणाऱ्या या जलतरण स्पर्धेत राज्यासह राष्ट्रीय, अंतराराष्ट्रीय स्पर्धक सहभागी होत असतात. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे जिल्ह्यातील स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होणे शक्य होत नसल्याने मालवण भाजपच्या वतीने
बाबा परब, उपाध्यक्ष जलतरण संस्था सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, पंकज सादये, ललित चव्हाण, कॅलिस फर्नांडिस उपस्थित होते.

यावेळी बाबा परब यांनी मालवण भाजपच्या विनंतीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांना प्रवेश फी मध्ये सवलत देण्यात येत असल्याचे सांगितले. या स्पर्धेसाठी यापूर्वी दोन हजार रुपये प्रवेश फी होती. यावर्षी प्रवेश फी अडीज हजार रुपये आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांना या प्रवेश फी मध्ये सवलत देण्यात येत असून जिल्ह्यातील स्पर्धकांकडून स्पर्धेसाठी १ हजार प्रवेश फी आकारण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा असे आवाहन भाजपा शहर मंडळ अध्यक्ष बाबा मोंडकर बाबा परब, उपाध्यक्ष जलतरण संस्था सिंधुदुर्ग यांनी केले आहे. स्पर्धेत आतापर्यंत ८ राज्य, २७ जिल्ह्यातील १,२०० स्पर्धक तर १ आंतर राष्ट्रीय स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे अशी माहिती बाबा परब यांनी दिली.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!