कणकवलीत ‘गावठी आठवडा बाजार’चा शुभारंभ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार नवी उभारी : पालकमंत्री नितेश राणे

कणकवलीत ‘गावठी आठवडा बाजार’चा शुभारंभ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार नवी उभारी : पालकमंत्री नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी)

         ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघुउद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या ‘गावठी आठवडा बाजार’चे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उपक्रमामुळे स्थानिक उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

          जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, ,
पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे
प्रकाश पारकर,पंकज दळी, संदीप सावंत, भाग्यलक्ष्मी साटम
यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, ग्रामीण अर्थकारणावर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न अवलंबून असते. या गावठी बाजारपेठेमुळे नागरिकांना स्थानिक स्तरावर दर्जेदार, ताज्या आणि विश्वासार्ह उत्पादनांची उपलब्धता होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी, महिला बचत गट आणि स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी थेट व्यासपीठ मिळणार असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या उपक्रमाचे अनुकरण जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांनीही करावे. अशा बाजारपेठांमुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील थेट संबंध दृढ होतील आणि स्थानिक उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होईल असेही श्री राणे म्हणाले.

शुभारंभानंतर पालकमंत्री श्री राणे यांनी बाजारातील विविध स्टॉलना भेट देत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या भाज्या, फळे, सेंद्रीय शेतीमाल, घरगुती खाद्यपदार्थ आणि स्थानिक उत्पादनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी आणि विक्रेत्यांशी संवाद साधून उत्पादनांची माहिती जाणून घेतली. तसेच या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल शेतकरी, महिला बचत गट आणि विक्रेत्यांचे अभिनंदन केले.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!