देवगड प्रतिनिधी
ऑल ईडीया धनगर समाज महासंघाची देवगड येथे घोगडी बैठक आवळीचे काटे या धनगर वसतीवर रात्री दिनांक 08/11/2024 रोजी बैठक संपन्न झाली
. या बैठकीमध्ये आपल्या वसतीवरील विविध समस्या माडल्या त्यामध्ये पाण्याचे गंभीर प्रश्न मांडले. व शासनाच्या विविध योजना कशा प्रकारे मिळाव्यात यासाठी कुठे प्रयत्न केले पाहिजेत पाण्याचा प्रश्न शासन स्तरावर पाठपुरावा करून कशा प्रकारे मार्गे लावता येईल याविषयीं मार्गदर्शन श्री विजय खरात याने केले
या भागातील धनगर समाजाच्या समस्या आणि मागण्या पूर्तता व्हावी या उद्देशाने झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीमध्ये धनगर समाजाचे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय खरात यांनी मार्गदर्शन केले धनगर समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकोप्याने राहण्याचे व संघटितपणे काम करण्याचे ठरविण्यात आले
ऑल एडीया धनगर समाज महासंघाच्या युवक आघाडी देवगड तालुकाध्यक्ष पदी श्री. अजित आप्पा बोडेकर यांची निवड करण्यात आली. नियुक्त पत्र देताना उपस्थित मान्यवर जिल्हध्यक्ष श्री. विजय खरात, रामचंद्र बोडेकर, आप्पा बोडेकर, गंगाराम बोडेकर, लक्ष्मी बोडेकर, माधुरी बोडेकर, अंकुश बोडेकर, नागेश बोडेकर, सागर बोडेकर, अंबाजी बोडेकर, कानू बोडेकर, बापू बोडेकर, गंगाराम बोडेकर, सुरेश फाले, राजेंद्र फाले, प्रवीण फाले, आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीचे आभार प्रदर्शन श्री. रामचंद्र बोडेकर याने मानले.








