देवगडमध्ये राजकारण पेटले ..
तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ प्रकरण
गुन्हा दाखल
देवगड:
मुणगे येथे मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत लावलेला बॅनर काढल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे (उबाठा) युवक सेलचे तालुकाप्रमुख गणेश गावकर यांच्यासह ५ जण आणि ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
अणुऊर्जा प्रकल्पाची जागा निश्चित नसल्याबाबतच्या बातमीचा बॅनर मुणगे येथे लावण्यात आला होता. ५ जुलै रोजी हा बॅनर पडल्याने रोहित नारायण कदम (वय २२, रा. कसाल, कुडाळ) हे तो बॅनर उचलून टेम्पोमध्ये भरत होते. यावेळी आरोपी मनोज सावंत याने रोहित यांना अडवून शिवीगाळ केली आणि इतरांना घटनास्थळी बोलावून घेतले.मारहाण आणि जातीवाचक अपमानाचा आरोप
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी आलेल्या आरोपींनी रोहित यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. रोहित हे अनुसूचित जातीचे असल्याचे माहिती असूनही, आरोपींनी त्यांच्याविरुद्ध जातीवाचक अपशब्द वापरून सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कोणाविरुद्ध आणि कोणत्या कलमांनुसार गुन्हा?
या प्रकरणी पोलीस ठाण्यात मनोज सावंत, प्रमोद वळंजु, राहुल वळंजु, छोटू (प्रमोद) सावंत, उबाठाचे देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर यांच्यासह ८ ते १० अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कलमे: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ (कलम ३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va)) आणि भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमे (११५(२), १८९(२), १९०, ३२४(२), ३५१(२)(३) व ३५२).
सध्या या प्रकरणाचा तपास अपर पोलीस अधीक्षक नयोमि साटम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटफिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी आलेल्या आरोपींनी रोहित यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. रोहित हे अनुसूचित जातीचे असल्याचे माहिती असूनही, आरोपींनी त्यांच्याविरुद्ध जातीवाचक अपशब्द वापरून सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान केला.








