.
कणकवली चॅम्पियन्स ट्रॉफी
‘नेवल युनायटेड’चा मोहोर;
कोल्हापूरच्या ‘जॉन संघटना’ला उपविजेतl
कणकवली प्रतिनिधी
कणकवली फुटबॉल क्लबच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘कणकवली चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६’ (पर्व ४ थे) स्पर्धेत मुंबईच्या नेवल युनायटेड संघाने अजिंक्यपद पटकावले. अंतिम अटीतटीच्या सामन्यात पेनल्टी शूटआउटमध्ये कोल्हापूरच्या जॉन संघटना संघाचा पराभव करत मुंबईच्या संघाने करंडकावर आपले नाव कोरले.
विद्यामंदिर हायस्कूलच्या मैदानावर ५ ते ७ जून या कालावधीत ही भव्य स्पर्धा पार पडली. या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा आणि सिंधुदुर्गातील एकूण १६ नामांकित संघांनी सहभाग नोंदवला होता.
अंतिम सामन्याचा थरार
अंतिम सामना मुंबईचा ‘नेवल युनायटेड’ आणि कोल्हापूरचा ‘जॉन संघटना’ यांच्यात रंगला. दोन्ही संघ बलाढ्य असल्याने सामना अत्यंत चुरशीचा झाला. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्याने निकालासाठी पेनल्टी शूटआउटचा आधार घ्यावा लागला. यात नेवल युनायटेडने ३-२ अशा फरकाने विजय मिळवला. मुंबईच्या संघाचा गोलकीपर करण विक्रम सिंग याने उत्कृष्ट बचाव करत अंतिम सामन्याचा ‘मॅन ऑफ द मॅच’ किताब पटकावला.
वैयक्तिक पुरस्कारांचे मानकरी:
- उत्कृष्ट स्ट्रायकर: सर्वेश वाडकर (जॉन संघटना, कोल्हापूर)
- उत्कृष्ट गोलकीपर: अनिल जानकर (जॉन संघटना, कोल्हापूर)
- उत्कृष्ट डिफेंडर: प्रांजल (नेवल युनायटेड, मुंबई)
- प्लेमेकर ऑफ द टूर्नामेंट: मानव दुखंडे (नेवल युनायटेड, मुंबई)
स्पर्धेची यशस्वी वाटचाल
स्पर्धेचे उद्घाटन कणकवलीचे प्रथम नागरिक संदेश पारकर, शहर पोलीस निरीक्षक नलावडे, डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेचे तांत्रिक कामकाज मुंबईचे फुटबॉल रेफरी सागर शिवडावकर यांनी चोखपणे पार पाडले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कणकवली फुटबॉल क्लबचे मुख्य सल्लागार संजय कदम, अध्यक्ष सूरजकुमार मणी आणि त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीने या स्पर्धेला दिलेला प्रतिसाद फुटबॉल प्रेमींसाठी पर्वणीच ठरला.








