कवी किशोर कदम लिखित बालविश्व काव्यसंग्रहाचे 15 रोजी प्रकाशन

कणकवली प्रतिनिधी..

बालविश्व काव्यसंग्रहाचे 15 रोजी प्रकाशन  – कवी अजय कांडर, कादंबरीकार उषा परब, ॲड. विलास परब, कवी विठ्ठल कदम, कवी मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती

कणकवली येथील कवी किशोर डी. कदम यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या बालविश्व या बालकाव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे शनिवार 15 मार्च रोजी सायं.४.३० वा. येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.

कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ कादंबरीकार तथा कोमसपाच्या केंद्रीय कार्यकारणी सल्लागार उषा परब यांच्या हस्ते बालविश्व काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य- सांस्कृतिक कार्यकर्ते ॲड. विलास परब, कोमसापाचे वरिष्ठ कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग साहित्य संघाचे सचिव जेष्ठ कवी विठ्ठल कदम, समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
किशोर कदम हे साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील क्रियाशील कार्यकर्ते असून निबंध आणि काव्य लेखन ते करत असतात. यापूर्वी प्रभा प्रकाशनातर्फे त्यांचे निबंध लेखनाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यांचा बालविश्व हा बालकवितांचा काव्यसंग्रह प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. या संग्रहाच्या सदर प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर, कादंबरीकार उषा परब, ॲड. विलास परब,कवी विठ्ठल कदम, कवी मधुकर मातोंडकर हे बालविश्व काव्यसंग्रहाबद्दल मांडणी करणार आहेत.
बालविश्व बालकाव्यसंग्रहातील कविता किशोर कदम यांनी आजवर जपलेल्या बालविश्वाची प्रचिती देतात. साध्या सोप्या शब्दात लिहिली गेलेली ही कविता बालवाचक आणि त्यांच्या पालकांनाही प्रभावित करते. बाल मनाचे भावनिक नाते ज्या भवतालाशी जोडले गेले आहे तो भवताल बालविश्व मधील कवितेच्या केंद्रस्थानी आहे. दुसऱ्या बाजूला बालपणाच्या जडणघडणीत ज्या निसर्गाशी आपण जोडलेले असतो तो निसर्ग आयुष्यभर सोबत कशी करतो याचा प्रत्ययही या कवितांमधून येतो. श्री कदम हे प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांचे नित्याचं जगणं बाल जीवनाशीच निगडित आहे. त्यामुळे बालकांचे भावनिक विश्व त्यांनी जवळून अनुभवलेले आहे. त्याचे सखोल चिंतन बालविश्व कवितेत प्रकटलेले दिसते. तरी या प्रकाशन सोहळ्याला साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!