ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर समाजाला घातक; खोटा गुन्हा दाखल केल्यास ‘प्रतिमोर्चा’ काढणार – संदीप कदम

​ॲट्रॉसिटी कायदा

गैरवापर समाजाला घातक; खोटा गुन्हा 

 ‘प्रतिमोर्चा’ 

 संदीप कदम

​कणकवली:

मुणगे (ता. देवगड) येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या वादातून दाखल करण्यात आलेला ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा खोटा असून, राजकीय हेतूने समाजाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. जर देवगडमध्ये मोर्चा काढला, तर त्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आम्ही ‘प्रतिमोर्चा’ काढू, असा इशारा बुद्धिस्ट फेडरेशनचे कार्याध्यक्ष संदीप कदम यांनी दिला. कणकवली येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणातील गैरवापर आणि राजकीय षडयंत्रावर जोरदार टीका केली.

​नेमके प्रकरण काय?

मुणगे गावात प्रस्तावित औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा एकमुखी विरोध आहे. प्रकल्पाच्या समर्थनार्थ रात्रीच्या वेळी निनावी बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात धक्काबुक्की झाली होती. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संदीप कदम म्हणाले की, “ज्या व्यक्तीला मारहाण झाली, तो पत्रकार परिषदेत ठणठणीत उभा होता, तर मारहाण झाली कशी? तसेच, घटनेच्या वेळी उपस्थित नसलेल्या लोकांचीही नावे गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. हा केवळ राजकीय द्वेषातून केलेला प्रकार आहे.”

​भाजपवर गंभीर आरोप

या घटनेमागे भाजपचा अजेंडा असल्याचे सांगत संदीप कदम यांनी अंकुश जाधव यांच्यावर निशाणा साधला. “स्विकृत जिल्हा परिषद सदस्यपद मिळवण्यासाठी अंकुश जाधव हे या प्रकरणाचा वापर करून समाजात संभ्रम निर्माण करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्याचा प्रयत्न कोणीही खपवून घेणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

​चर्मकार समाज उन्नती मंडळाचा आक्षेप

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव म्हणाले, “आमच्या संघटनेचे नाव विनापरवानगी वापरून गैरसमज पसरवला जात आहे. कोणत्याही घटनेत मारहाण झाली असेल तर कायदेशीर कारवाई व्हायला आमचा विरोध नाही, परंतु पुरेशा पुराव्याशिवाय ॲट्रॉसिटीसारख्या गंभीर कायद्याचा वापर करणे चुकीचे आहे. भविष्यात अशाप्रकारे संघटनेचे नाव वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

​सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन

मुणगेचे उपसरपंच दशरथ मुणगेकर यांनी सांगितले की, गावात सामाजिक सलोखा कायम असून, जातीच्या आधारावर भेदभाव किंवा डॉ. आंबेडकरांचा अवमान अशी कोणतीही घटना घडलेली नाही. गाव एकजुटीने प्रकल्पाला विरोध करत आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.

​या पत्रकार परिषदेला सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, मुणगे उपसरपंच दशरथ मुणगेकर, खुडीचे सरपंच दीपक कदम, नगरसेवक लुकेश कांबळे यांच्यासह बौद्धाचार्य ल. का. कदम आणि मुणगेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली आहे.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!