मृत महिलेच्या कुटुंबियांना ५ लाखांची भरपाई ; चार तासानंतर एस.टी. बसेस मार्गी…

कणकवली प्रतिनिधी

कणकवली बसस्थानकातील ठिय्या आंदोलन मागे…मृत महिलेच्या कुटुंबियांना ५ लाखांची भरपाई ; चार तासानंतर एस.टी. बसेस मार्गी…

  1.             दोन एस.टी. बसेस मध्ये चिरडल्याने फातिमा रियाज बोथरे (वय ३६, रा. मेहबूब नगर उंबर्डे, ता. वैभववाडी) या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी चार तास ठिय्या आंदोलन केले. अखेर एस.टी. अधिकाऱ्यांनी तातडीने पाच लाख रूपयांची आर्थिक मदत देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच तब्बल चार तास खोळंबलेली एस.टी.ची वाहतूक सेवा पूवर्वत झाली.

कणकवली बसस्थानकातील दोन फलाटामध्ये एक बस मागे येत होती. तर एक बस पुढे जात होती. या दोन बस मध्ये चिरडल्याने फातिमा बोथरे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, अपक्ष उमेदवार नवाज खानी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, निसार शेख, सोहम वाळके, महेश कोदे, संदीप मेस्त्री, सोनू सावंत, अण्णा कोदे, गणेश तळगावकर, प्रज्वल वर्दम, आशिये सरपंच महेश गुरव आदींसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत आगार व्यवस्थापक श्री. यादव यांना धारेवर धरले. तसेच मृत महिलेच्या कुटुंबियांना जोवर पाच लाख रूपयांची भरपाई मिळत नाही. तसेच अपघाताला जबाबदार असलेल्या एस.टी. चालक आणि वाहक निलंबन होत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला होता.

दुपारी दोन वाजता प्रभारी विभाग नियंत्रक विक्रांत देशमुख कणकवली बसस्थानकात दाखल झाले. त्यानंतर चर्चेअंती एस.टी. अधिकाऱ्यांच्या मार्फत तातडीने पाच लाख रूपयांची भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले. त्याला मृत महिलेच्या कुटुंबियांनी सहमती दर्शवली. तसेच एस.टी. महामंडळामार्फतही मृत महिलेच्या कुटुंबियांना लवकरात लवकर भरपाई देण्याची ग्वाही श्री. देशमुख यांनी दिली. यानंतर कणकवली बसस्थानकातील आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर दुपारी अडीच वाजता कणकवली बसस्थानकात खोळंबलेल्या सर्व बसेस मार्गस्थ करण्यात आल्या.

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

पुढे वाचा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

पुढे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे विसरू नका

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

error: Content is protected !!