कणकवलीत आजपासून पर्यटन महोत्सवाची मांदियाळी

  1. कणकवलीत आजपासून पर्यटन महोत्सवाची धामधूम…

१२ जानेवारी पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी ; शोभायात्रेचे खास आकर्षण

सलमान अली, रिशी सिंग, सायली कांबळे, पवनदीप- अरूणिता यांच्या ऑकेस्ट्राचे आयोजन

कणकवली शहरातील उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणावर भाजपच्यावतीने ९ जानेवारी पासून कणकवली पर्यटन महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ५ वाजता शहरातून विविध चित्ररथांचा समावेश असलेली भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून कणकवली वासीयांसाठी ते खास आकर्षण असणार आहे. अशी माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

इंडियन आयडॉल विजेते गायक सलमान अली, रिशी सिंग, सायली कांबळे, नितीन कुमार यांच्यासह पवनदीप आणि अरूणिता कांजिवाल तसेच चेतना भारद्वाज यांच्या गायनाचा प्रत्यक्ष आस्वाद घेण्याची संधी कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने संगीत रसिकांना मिळणार आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार असून आमदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर कदम, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तर माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे, निलम र यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार आहे.

समीर नलावडे म्हणाले, पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ ९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता होणार आहे. त्यादृष्टीने तयारी पूर्ण झाली आहे. उद्घाटना पूर्वी कणकवली शहरातील १७ प्रभाग आणि चार प्राथमिक शाळांचा सहभाग असलेल्या चित्ररथांसह भव्य शोभायात्रा निघणार आहे. त्यानंतर सलमान अली आणि वाद्यवृंद यांचा बहारदार ऑर्केस्ट्रा होणार आहे.

१० जानेवारीला कणकवली शहर आणि परिसरातील तब्बल २५० कलावंतांचा सहभाग असलेला ‘कनकसंध्या’ हा कार्यक्रम रात्री ८ वाजता रंगणार आहे. ११ जानेवारीला इंडियन आयडॉल फेमच रिशी सिंग, सायली कांबळे, नितीन कुमार आणि वाद्यवृंद यांचा ऑर्केस्ट्रा असणार आहे. रविवारी १२ जानेवारीला खासदार नारायण राणे, निलम राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यटन महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर इंडियन आयडॉल फेम पवनदीप आणि अरूणिता कांजिवाल तसेच चेतना भारद्वाज यांचा ऑकेस्ट्रा होणार आहे. याखेरीज पर्यटन महोत्सवाचे चारही दिवस फूड फेस्टिव्हल होणार आहे. यामध्ये ७० स्टॉल लावण्यात येणार आहेत. खवय्यांसाठी ही विशेष मेजवानी असणार आहे. कणकवली शहरातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार देखील यानिमित्ताने होणार आहे. तसेच रिल्स स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात ये आहे. असेही समीर नलावडे यावेळी म्हणाले.

  • संबंधित पोस्ट

    कळसुली जिल्हा परिषद शाळा नं. १ येथे सरस्वती पूजन उत्साहात साजरा!

    कळसुली जिल्हा परिषद शाळा नं. १  सरस्वती पूजन   ​सरस्वती मातेच्या पूजनासह महिला व विद्यार्थ्यांच्या फुगड्या, भजन आणि दांडिया नृत्याने कार्यक्रमात भरली रंगत ​कणकवली | कोकणराज लाईव्ह : कणकवली तालुक्यातील जिल्हा…

    पुढे वाचा

    मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!

    मालवण तालुका मैदानी स्पर्धl शिरवंडे ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’;  १६ खेळाडू जिल्हास्तरावर  | शिरवंडे (मालवण): त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचालित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथे आयोजित करण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय मैदानी…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    कळसुली जिल्हा परिषद शाळा नं. १ येथे सरस्वती पूजन उत्साहात साजरा!

    मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!

    मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!
    भक्तिरस, लोककला अन् उत्साहाचा त्रिवेणी संगम : कळसुली इंग्लिश स्कूलमध्ये शारदोत्सव उत्साहात

    कणकवलीत ‘जयभवानी गोंधळी समाज संघा’च्या नवरात्रोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट!

    कणकवलीत ‘जयभवानी गोंधळी समाज संघा’च्या नवरात्रोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट!

    बांदा येथे सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा शानदार सोहळा; कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा बांदावासीयांकडून विशेष सत्कार!

    बांदा येथे सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा शानदार सोहळा; कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा बांदावासीयांकडून विशेष सत्कार!

    ओरोस बुद्रुकच्या दत्तकृपा      मित्रमंडळ नवरात्रोत्सवाला   नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट; दुर्गामातेचे घेतले दर्शन

    ओरोस बुद्रुकच्या दत्तकृपा      मित्रमंडळ नवरात्रोत्सवाला   नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट; दुर्गामातेचे घेतले दर्शन
    error: Content is protected !!