कृषी दिनी झारापच्या शरद धुरी यांचा राज्यस्तरीय सर्वोच्च सन्मान; ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने’ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

 शरद धुरी 

राज्यस्तरीय सर्वोच्च सन्मान;

कृषिभूषण पुरस्कार 

कुडाळ | प्रतिनिधी

कृषी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आज मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप गावचे प्रगतशील शेतकरी शरद गणपत धुरी यांना राज्यातील सर्वोच्च मानाच्या ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने’ राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या अभिमानास्पद कामगिरीमुळे झाराप गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

        कृषी क्षेत्रात सातत्याने केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शाश्वत शेतीचा प्रसार तसेच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेले कार्य याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठी शरद गणपत धुरी यांची ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली होती. कृषी दिनानिमित्त मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे झालेल्या भव्य सोहळ्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन शरद धुरी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दादाजी भुसे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शरद धुरी यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत उत्पादनवाढ, नाविन्यपूर्ण शेती पद्धती, फळबाग लागवड, पर्यावरणपूरक शेती आणि शेतकरी मार्गदर्शन या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्यातील सर्वोच्च कृषी सन्मानाने गौरविले आहे.

झाराप गावातील एका शेतकऱ्याला राज्यस्तरीय सर्वोच्च कृषी पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी फटाके फोडून व एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष साजरा केला. विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील मान्यवरांकडून शरद धुरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या पुरस्कारामुळे झाराप गावाचे नाव राज्याच्या कृषी क्षेत्रात अभिमानाने झळकले असून, शरद धुरी यांचे यश हे केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याच्या भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत. त्यांच्या कार्यातून नव्या पिढीतील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार असून, आधुनिक आणि शाश्वत शेतीचा आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!