जागतिक पर्यावरण दिन तळेरे
स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण;
सरपंच हनुमंत तळेकर यांचा ‘हरित तळेरे’
तळेरे प्रतिनिधी |
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तळेरे ग्रामपंचायतीच्या वतीने तळेरे स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारच्या फळझाडांचे आणि सावली देणाऱ्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. स्मशानभूमी परिसर सुशोभित आणि हरित करण्यासाठी सरपंच हनुमंत तळेकर यांनी हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
पर्यावरण रक्षणासाठी विशेष पावले
![]()
![]()
![]()
सरपंच हनुमंत तळेकर यांनी आपल्या कार्यकाळात विकासासोबतच स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाला प्राधान्य दिले आहे. श्री देव गांगेश्वर मंदिर देवराई परिसराप्रमाणेच आता स्मशानभूमी परिसर हरित करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत लावलेल्या रोपांना सेंद्रिय खत देऊन त्यांच्या संरक्षणासाठी लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत, जेणेकरून या वृक्षांचे योग्य संगोपन होऊन परिसर नंदनवन होईल.
लोकसहभागातून वृक्षारोपण यशस्वी
या वृक्षारोपण कार्यक्रमात ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, निसर्गप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये ग्रामविकास अधिकारी सौ. राजलक्ष्मी जाधव, माजी पं.स. सभापती दिलीप तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, ग्रा.प. सदस्य सागर डंबे, माजी उपसरपंच शशांक तळेकर, शैलेश सुर्वे, सुयोग तळेकर, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश सोरप, डॉ. धनश्री जाधव, ग्रा.प. कर्मचारी बाबू मेस्त्री, नंदू देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
फोंडाघाट येथील कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी अरिहंत अंकलखोपे, आदर्श कोरे, संग्राम पाटील, रोहित देशपांडे, शर्विल पाटील, प्रतिक मोरस्कर, हर्षल पालये, तन्मय पालये, हिमांशू राणे आणि ओंकार सुतार यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविकांनीही या उपक्रमाला आपला पाठिंबा दर्शविला. निसर्ग मित्र परिवार आणि कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या विशेष सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.








