कणकवली येथे २९ नोव्हेंबरपासून त्रिसूत्री संगीत महोत्सव /वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आयोजन

कणकवली प्रतिनिधी

 २९ नोव्हेंबरपासून त्रिसूत्री संगीत महोत्सवाचे संतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजन

 येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतीक प्रतिष्ठानतर्फे कणकवली येथे संस्थेच्या नाट्यगृहात २९नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत त्रिसूत्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या त्रिसूत्री संगीत महोत्सवा अंतर्गत २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा होणार आहे.
सकाळी ९.३० उद्घाटन सोहळा होईल.सायंकाळी ७ ते ७:३० शास्त्रोक्त गायन प्रथम विजेता (वामन दाजी शास्त्रीय गायन स्पर्धा २०२४) त्यानंतर ७:३० ते ८ शास्त्रोक्त गायन श्रुती सावंत (पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्राची विद्यार्थिनी),रात्री ८ ते ९ सारंगी वादन संगीत मिश्रा (मुंबई) हे करणार आहेत.त्यांना तबला साथ चारूदत्त फडके (पुणे)करणार आहेत.रात्री ९ ते १० भरतनाट्यम् नृत्य-प्रिया जोशी (पुणे)या सादर करणार आहेत.
३० नोव्हेंबर रोजी रसग्रहण कार्यशाळा होणार आहे. सकाळी १० ते ५:३०या कालावधीत पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या ख्यालाच्या बंदीशी याविषयी पं. सुधाकर देवळे, पं. वसंत मराठे, व पं. शौनक अभिषेकी हे मार्गदर्शन करणार आहेत.

रात्री ७ते ८ या कालावधीत
शास्त्रोक्त गायन पं.सुधाकर देवळे, उज्जैन (पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य), रात्री ८ ते ८:३० या कालावधीत शैला मुकुंद लिखित ग्रंथ ‘अभिषेकी… कला व जीवनप्रवास’ चा पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्यवृंदांच्या हस्ते प्रकाशन सोहळा होईल.
रात्री ८:३० ते १० शास्रोक्त गायन-पं. शौनक अभिषेकी करतील.त्यांना संवादिनी साथ चिन्मय कोल्हटकर (गोवा) व तबला साथ चारुदत्त फडके (पुणे)हे करतील.१ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १:३० या कालावधीत रसग्रहण कार्यशाळा होईल. त्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी स्मृति संगीत महोत्सवाला प्रारंभ होईल. त्याअंतर्गत सायंकाळी ७ ते ८:३० तबला एकल वादन पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर हे करतील.त्यांना
साथसंगत तबला सावनी तळवलकर, संवादिनी चिन्मय कोल्हटकर करतील. तर गायन पं. डॉ. समीर दुबळे हे करतील.
रात्री ९:०० ते १०:३० शास्त्रोक्त गायन पद्मश्री पं. उल्हास कशाळकर यांचे होईल. त्यांना तबला साथ पं. सुरेश तळवलकर व संवादिनी साथ चिन्मय कोल्हटकर (गोवा) हे करतील.या संगीत सोहळ्याचा लाभ रसिकांनी घ्यावा,असे आवाहन आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ॲड.एन. आर.देसाई यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

पुढे वाचा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

पुढे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे विसरू नका

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

error: Content is protected !!