गांधी चौक मित्रमंडळ बांदा
नवरात्रोत्सव
संदेश पारकर

देवीची महाआरती!
३३ वर्षांची धार्मिक परंपरा; बळीराजाचे राज्य येऊ दे, बेरोजगारी नष्ट होऊ दे, संदेश पारकर यांची देवीचरणी प्रार्थना
बांदा :
येथील सार्वजनिक नवरात्र उत्सव गांधी चौक मित्रमंडळाच्या वतीने गेली ३३ वर्षे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीची महाआरती भक्तिभावाने पार पडली.
या प्रसंगी संदेश पारकर यांनी देवीच्या चरणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. बळीराजाचे राज्य येऊ दे, जिल्ह्यातील बेरोजगारी नष्ट होऊ दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे, सिंधुदुर्ग जिल्हा सुजलाम-सुफलाम व्हावा आणि शेतकरी सुखी-समृद्ध व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली.
सार्वजनिक नवरात्र उत्सव गांधी चौक मित्रमंडळाने गेल्या ३३ वर्षांपासून धार्मिक परंपरा जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन केले जात आहे.
यावेळी सार्वजनिक नवरात्र उत्सव गांधी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दर्पण आळवे, प्रसाद वाळके,निलेश कदम, सिद्धेश महाजन,चेतन मुंगी, ज्ञानेश्वर येगवे, साईप्रसाद काणेकर, धनेश नाटेकर, अनंत नाटेकर, , ओमकार नाडकर्णी, भाऊ वाळके, रामा सावंत, अजित गाड, राजेश वीरनोडकर शांत पांग,निलेश उर्फ बाबू कदम, मंदार महाजन, प्रसाद पावसकर, चंदा सावंत, राजेश विरनोडकर, सुशांत पांगम, कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालनकर, सामाजिक कार्यकर्ते बबली राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
देवीच्या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसह शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेल्या प्रार्थनेमुळे या धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.







